Club News
  • No News reported.

President's Blog

Rotary

डिस्ट्रीक्ट गव्हर्नर असावा तर असा!

रोटरी क्लब ऑफ पुणे धायरीचा पदग्रहण समारंभ २९ जुलै रोजी विद्यमान प्रांतपाल रोटे. डॉ. गिरीश गुणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. प्रांतपालांच्या हस्ते २०१२-१३ या वर्षासाठी होणारा हा ४१वा पदग्रहण समारंभ. मी रोटरी क्लब ऑफ पुणे धायरीचा संस्थापक अध्यक्ष म्हणून क्लबची सदस्य संख्या वाढवण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्‍नांना यश येऊन, एकाच दिवशी ११ नवीन मेंबर्सचे इंडक्शन संपन्न झाले. मेंबर्सना सभासदत्व बहाल केल्यानंतर दिल्या जाणार्‍या पिन्स उपलब्ध नव्हत्या. प्रांतपाल डॉ. गिरीश गुणे यांना ही अडचण मी २८ जुलै रोजी सांगितली. त्वरित पिन्स उपलब्ध होणे शक्यच नव्हते. प्रांतपालांनी मला आश्वासन दिले की उद्या पदग्रहण समारंभासाठी येताना मी पिन्स घेऊन येईन. कार्यक्रमाच्या नियोजित वेळेच्या १५ मिनिटे आधी प्रांतपाल कार्यक्रमस्थळी हजर झाले आणि त्यांनी आवश्यक त्या पिन्स माझ्या हाती ठेवल्या. १९९७ पासून मी रोटरीत आहे. पदग्रहण समारंभाला जाताना नवीन सभासद होणार्‍यांसाठी पिन्स आठवणीने बरोबर घेऊन येणारा असा प्रांतपाल मला पहिल्यांदाच अनुभवास आला.

प्रांतपाल डॉ. गिरीश गुणे यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार.

पीपी रोटे. डॉ. राजेंद्र भवाळकर
रोटरी क्लब ऑफ पुणे धायरी